NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा
धर्माबाद ( प्रतिनिधी ):- एनएसएसई या राष्ट्रीय स्कॉलरशिप परीक्षेत धर्माबाद शहरातील श्रवण सतिष पाटिल शिंदे या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले असून स्टेटरँक मध्ये टॉप 20 क्रमांक मिळवीत गोल्ड मेडल पटकावले आहे.
श्रवण सतिष शिंदे हा जेष्ठ पत्रकार सतिष पाटिल शिंदे यांचा मुलगा असून धर्माबाद शहरातील राजाराम काकानी सहकार विद्यालयात इयता सातवी मध्ये शिकत आहे. नॅशनल स्कॉलर सर्च परिक्षेत 2024 मध्ये स्टेट रँक मध्ये टॉप 20 क्रमांक मिळवत गोल्ड मेडल पटकावले आहे. यशोदीप कोचिंग क्लासेस यांच्या माध्यमातून तो या स्पर्धा परीक्षेत सहभागी झाला होता. सदरील परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून श्रवण सतिष पाटिल शिंदे यांस गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.