18.1 C
New York
Wednesday, October 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

आमदार राजेश पवार यांचे धर्माबाद शहरात प्रथमच आगमनार्थ ; राष्ट्रवादी(अजित दादा गट) कडून भव्य सत्कार…..

“मी आपला सर्व मतदान बांधवांचा आभारी आहे. माझी ही आमदारकी सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून मिळाली मी आपणास समर्पित करतो”. – आमदार राजेश पवार.

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद ( प्रतिनिधी ):- नायगाव विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश पवार यांचा प्रथम आगमनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या(अजित दादा गट) वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सहसचिव वैभव कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बिपटवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक पाटील चोळाखेकर, किरण पाटील बेंद्रे, बालाजी पाटील आलुरकर, जेष्ठ व्यापारी अशोक येमेवार, माजी नगरसेवक बिरप्पा मदनुकर ,सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर धडेकर यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

नायगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार यांनी दुसऱ्यांदा भरघोस निवडूण आल्यानंतर दि.13 डिसेंबर रोजी शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे शहर ,रत्नाळी,बाळापुर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जंगी स्वागत करुन आमदार राजेश पवार साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माता की जय,असे नारे दिले.आमदार राजेशजी पवार यांनी मला दुसऱ्यांदा नायगाव विधानसभा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी करुन सेवा करण्याची संधी दिली “मी आपला सर्व मतदान बांधवांचा आभारी आहे. माझी ही आमदारकी सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादातून मिळाली मी आपणास समर्पित करतो.”जाती पातीच्या पलीकडे जाऊन मागील काळापेक्षाही कित्येक पटीने विकासात्मक कामे करून,नायगाव मतदार संघाचा कायापालट करणार असल्याचे बोलताना सांगितले.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विजय पाटील डांगे, शहर अध्यक्ष रमेश गौड, युवा शहर अध्यक्ष सतिश मोतकुल, नायगाव विधानसभा प्रमुख विठ्ठल पाटील चोळाखेकर , सोशल मीडिया साईनाथ शिरपुरे, भावी नगराध्यक्ष शंकर आन्ना बोलमवार, माजी नगरसेवक संजय पवार,वर्णी नागभुषण, साहेबांचे विश्वासू सुनील पाटील शिंदे, संपादक बाबुराव पाटील आलुरकर,विश्वनाथ आप्पा रोशनगावकर, अँड चक्रेश पाटील बन्नाळीकर, दत्ताहारी पाटील आवरे, विजय राठोड, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड, काशिनाथ उशलवार, प्रविण बेलूरकर,सज्जन गडोड,सुनील पाटील कदम, बाबू पाटील बाळापूरकर, गजानन कुरंदे, अशोक पाटील बाळापूरकर, चैतन घाटे, योगेश डोईजड,आकाश अपलोड, अशोक पुजरवाड, अलीम चौधरी, गोणारकर भोजराम, साईनाथ बोईनवाड,,बालाजी कट्टावाड यांच्या सह ग्रामीण भागातील नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या