NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा
धर्माबाद( प्रतिनिधी ):- भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने पंचशील आश्रम, दिल्ली या ठिकाणी दोन दिवसीय ४० वा राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलन पार पडला. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथील सहकारी तथा माजी केंद्रीय मंत्री राजेंद्रपाल गौतम हे होते. यासह प्रमुख पाहुणे म्हणून मा.तितर तोगरया, डॉ.सुरेन्द्र सेलवाल, उपरप्राचार्य एम. एल. रंगा, कवी मधू बावलकर (आदिलाबाद) या सह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय दलित साहित्य अकादमी चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर आणि राष्ट्रीय महासचिव जय सुमनाक्षर यांच्या हस्ते महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातून धर्माबाद तालुक्यातील लेखक ,पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रभीम गंगाधर हौजेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्काराने सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला. सलग 40 वर्षांपासून अकादमीच्या वतीने राष्ट्रीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.ज्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे अशांचा विविध क्षेत्रातील राष्ट्रिय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय स्थानावरून मार्गदर्शन करीत असताना माजी केंद्रीय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी म्हणाले की, यादेशातील बहुजन चळवळ, आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ, राजकीय चळवळ सर्व चळवळीला गतिमान करण्यासाठी भारतीय संविधानाचा अभ्यास असणे गरजेचे आहे. प्रत्येकांनी आपले कर्तव्य आणि आपली जबाबदारी समजुन घेऊन भविष्यात वाटचाल केल्यास यश आपल्याला निश्चित मिळू शकते.या सर्व चळवळी जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातून आपण चळवळीला योगदान दिले पाहिजे. चालू असलेल्या दलित साहित्य अकादमीचे कार्य हे कौतुकास्पद आहे असे मत संमेलनाच्या अध्यक्ष स्थानावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथील सहकारी तथा माजी केंद्रीय मंत्री राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय साहित्य संमेलनात धर्माबाद येथील पत्रकार, लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रभिम हौजेकर यांना २०२४ चा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार” देउन सन्मानीत करुन गौरविण्यात आल्याबद्दल महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक ,पत्रकार आदी शेत्रातून राजकिय पक्ष व विविध सामाजिक संघटना आणि मित्रपरीवाराच्या वतीने अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.