NANDED | युवा रक्षक वृत्तसेवा
नांदेड :- संसदीय वैधानिक संस्थांच्या निवडणूकिचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी एम्स ( अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ) च्या समितीवर राज्यसभा सदस्य खा. डॉ. अजित माधवराव गोपछडे यांची निवड करण्यात आली, असे संसदीय समिती समन्वय विभागाने जाहिर केले आहे.
या निवडीबद्दल बोलताना खा. अजित गोपछडे म्हणाले की , केंद्रीय नेतृत्व पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह , राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी ही आरोग्य क्षेत्रातील जबाबदारी मला दिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाचा अखंड झरा तसेच महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या सोबतीने आता आंध्रप्रदेशातील आरोग्य सेवा उत्तम करण्यासाठी माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जबाबदारी दिली याबद्दल सर्वांचे आभार मानतो अशी भावना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान खासदार अजित गोपछडे यांची यापूर्वी केंद्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक समित्यांवर निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पार्टीतील केंद्रीय स्तरावरील अत्यंत विश्वासू नेतृत्व म्हणूनही खा. अजित गोपछडे यांच्याकडे पाहिले जाते. नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि तत्पुरी झालेल्या लोकसभा निवडणुकीतही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी प्रचाराची धुरा अत्यंत सार्थपणे सांभाळली होती . त्यामुळे भाजपाकडून त्यांच्या खांद्यावर अनेक नवनवीन जबाबदाऱ्या सोफविल्या जात आहेत.