NANDED | उमरी | युवा रक्षक वृत्तसेवा
उमरी(प्रतिनिधी) :- तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथे कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत आद्य कवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्यात आली.
प्रतिमेच पुजन करुन झेंडावंदन ईरबा तुकाराम टोंपे यांच्या शुभ हस्ते झाले. नवनिर्वाचित तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय पाटील मुंगल,दिगांबर जगताप यांच्यासह गावातील चिमुकल्यांची भाषणे झाली.
रामायण या महान ग्रंथाचे रचयिते ऋषी वाल्मिकी होते. वाल्मिकीचा जन्म अश्विन महिन्याच्या पोर्णिमेच्या दिवशी झाला. या दिवसाला हिंदू धार्मिक दिनदर्शिकेत वाल्मिकी जयंती म्हणतात.यंदा वाल्मिकी जयंती दि.१० डिसेंबर उत्साहात साजरी झाली. प्रमुख अतिथी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर देशमुख धानोरकर,माजी पं.स.सदस्य विठ्ठलराव सर्जे, तंटामुक्त अध्यक्ष दत्तात्रय पाटील मुंगल,उद्योजक आनंदराव पाटील सलगरे,उपसरपंच कैलास देशमुख धानोरकर, दिगांबर जगताप,पोलीस पाटील राहुल पांचाळ, ज्ञानेश्वर मामडे,दत्ता मोळके,मोहन बळवंते,दत्ता सोगे, अनिल मेडेवाड,उमेश डोकळे, अध्यक्ष रूकमाजी अंबिरे,उपाध्यक्ष साईनाथ घंटेवाड,सचिव ऋषिकेश बारोळे, कोषाध्यक्ष साईप्रसाद जगताप, सहसचिव आकाश अंबिरे,रोहिदास डोकळे, साईनाथ नागरे,दिंगांबर सोगे, अविनाश नांगरे,गलांडे गणेश, राम मामडे,लक्ष्मण बळवंते,टोपाजी मिनके, अत्री बळवंते ,बाळा दुसरे,श्रीकांत बळवंते, जळबा बारोळे,साईप्रसाद मामडे, माधव डोकळे,बंटी मेडेवाड, रूकमाजी बारोळे, ऋषिकेश मामडे,माधव घोरपडे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, समाज बांधव उपस्थित होते.