NANDED | धर्माबाद.| युवा रक्षक वृत्तसेवा
धर्माबाद(प्रतिनिधी) : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला एका मातेफेरूने १० डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान विटंबना केली,या घटनेच्या विरोधात धर्माबाद तालुक्यातील बौध्द अनुयायांनी व संविधान प्रेमिनी (ता.११) रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांना परभणीच्या घडलेल्या घटनेच्या विरोधात धर्माबाद बंदचे हक्क व आक्रोश मोर्च्याचे निवेदन देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयघोषात मोर्चा काढण्यात आला.
धर्माबाद मध्ये कडकडीत बंद व निषेधार्थ जोरदार नारेबाजी….
काॅलेज रोड बस्व हिल्स, रामनगर चौक, आंध्र बस स्थानक, नेहरू चौक,पोलीस स्टेशन, पानसरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय येथे आक्रोश मोर्चा धडकला तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरी चळवळीतील नागरिक व भारतीय संविधान प्रेमी नागरिकांनी या मोर्चामध्ये मोठया संख्येने उपस्थित होते,बंदला व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिसात देत आपली दुकाने व प्रतिष्ठान बंद ठेऊन मोर्च्यामध्ये एकां प्रकारे सहभाग नोंदविले आहे.परभणी येथील घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संरक्षणासाठी
पोलिस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी अतिरिक्त पोलिस फौज फाट्यासह सज्ज झाले होते.यावेळी”जबतक सुरज चांद रहेगा डॉ.बाबासाहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा, आरोपीला फाशी झाली पाहिजे”अशा वेगवेगळ्या घोषणाने धर्माबाद गुंजले, यासह अनेक मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा धडकले आहे.या वेळेस,परभणी येथील घटनेच्या विरोधात मातेफेरूवर कठोर कारवाई करुन फाशी देण्यात यावी अशी भावना व्यक्त केल्या.तालुक्यातील महापुरुषांच्या पुतळ्याचे संरक्षण व भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करून शपथ घेतली.भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सदानंद देवके, कोषाध्यक्ष सुभाष कांबळे,वंचित तालुक्यातील एकनाथ जिंकले, महासचिव गौतम देवके,कुलदिप मस्के,बुध्दीवंत लोखंडे, भगवान कांबळे, जेष्ठ पत्रकार जी.पी.मिसाळे, जे.के.जोंधळे, पत्रकार गंगाधर धडेकर , सुधाकर जाधव,चंद्रभिम हौजेकर, मिना भद्रे, बाबुराव पाटील आलुरकर,म.जावेद सर, रजाक सर यांच्या सह अनेक बौध्द अनुयायांनी नायबतहसीलदार गावंडे यांना निवेदन दिले.यावेळी मोर्चा दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस प्रशासनाने मोठ्या बंदोबस्त ठेवण्यात आला होता.