7.2 C
New York
Thursday, April 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

वसमत येथील पूर्णा सहकारी कारखाना येथे आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या संचालक मंडळ तर्फे भव्य सत्कार…..

वसमत (प्रतिनिधी):- वसमत चे नवनिर्वाचित आमदार तथा पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजूभैय्या नवघरे यांचा शुक्रवारी पूर्णा कारखाना येथे अध्यक्ष व संचालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

वसमत विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच आमदार राजू नवघरे यांनी आज पूर्णा कारखान्यास भेट दिली असता पूर्णा कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर,उपाध्यक्ष डॉ.कदम व सर्व संचालक मंडळांनी राजू नवघरे यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी सर्व संचालक मंडळ,कार्यकारी संचालक आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या