युवा रक्षक वृत्त संकलन
नांदेड(प्रतिनिधी): नांदेड येथे Star Snooker Academy तर्फे ओपन Snooker Tournament 2024 स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या Snooker स्पर्धामध्ये नामवंत 50 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता ला 15000 , द्वितीय विजेता ला 5000 अशे पारितोषिक ठेवण्यात आले होते.
या Snooker Tournament स्पर्धेमध्ये शेख हिबजूर रहेमान रा. चैतन्या नगर नांदेड. यांनी प्रथम क्रमांक पटकवून आपला प्रथम स्थान प्राप्त केला आहे. शेख हिबजूर रहेमान हे Snooker या खेळामध्ये मराठवाड्याचे सर्वात अनुभवी खेळाडू असून, हे एक क्रीडा प्रेमी पण आहे. यांना Snooker या खेळामध्ये 24 वर्षाचा अनुभव असून यांना अनेक स्पर्धेमध्ये अनेक पारितोषिक भेटलेले आहे.शेख हिबजूर रहेमान यांनी अनेक खेळाडू यांना Snooker या खेळाचे प्रशिक्षण दिले आहे.