माहूर :- भारतीय लोकशाहीचा सर्वोच्च ग्रंथ असलेल्या संविधान पुस्तकाच्या प्रकृतीची परभणी येथे दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड झाल्याची घटना घडली ,असल्यामुळे परभणीसह संपूर्ण महाराष्ट्र मधून संविधान प्रेमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्व संघटनां तीव्र निषेध व्यक्त करीत असून, माहूर मध्ये भिम टायगर सेना माहूर तालुक्याच्या वतीने माहूरचे नायब तहसीलदार कैलास जेठे , यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून, संविधान प्रकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून, देशामध्ये पुन्हा यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नये, म्हणून सदर बाबीला आळा घालण्याकरिता आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा भिम टायगर सेना महाराष्ट्र राज्यामध्ये रस्त्यावर उतरेल अशा आशयाचे निवेदन दिले.
त्यावेळी भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष प्रवीण बरडे, किनवट / माहूर विधानसभा अध्यक्ष शंकर भालेराव, तालुका संपर्कप्रमुख समाधान कांबळे, रफिक गाईड, कनिष्क वानखेडे, तुषार कांबळे, बाबाराव दवणे, रितेश कांबळे, संतोष माने, मनोज जाधव, सविधान प्रेमी व समाज बांधव उपस्थित होते.