धर्माबाद (प्रतिनिधि):- महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद महाराष्ट्र शासन आयोजित शिक्षणाधिकारी प्रा. जि.प.नांदेड डॉ.सविता बिरगे यांच्या आदेशान्वये गट शिक्षणाधिकारी धर्माबाद रविशंकर मरकंटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी बीट- धर्माबाद बि.डी.जाधव यांनी कार्यशाळा प्रमुख म्हणून काम पाहिले.
बि.डी.जाधव यांनी अपार आयडी सह इतर प्रशासकीय कामाचा आढावा घेतला. येत्या दोन दिवसात शंभर टक्के अपार आयडीचे उद्दिष्ट साध्य करू असे उपस्थित मुख्याध्यापकांनी सांगितले. हे प्रशिक्षण जिल्हा प्रशिक्षण समन्वयक विनय गव्वल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशिक्षण समन्वयक श्याम देशमुख व त्यांचे सहकारी अरविंद पद्मावार, कपिल कोंडेवाड, दिनेश भालेराव, सुशांत गमेवाड, स्मिता पाटील, वैशाली शिंदे यांनी प्रशिक्षण कार्यशाळेत उत्कृष्टरित्या सहभाग नोंदविला.या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रमुख उपस्थिती श्री शिवकुमार पाटील शिक्षण विस्तार अधिकारी बीट करखेली,मुख्याध्यापिका जि. प.हा.धर्माबाद सौ.खानापूरकर मॅडम, केंद्रप्रमुख बाळापुर भगत सर, केंद्रप्रमुख रत्नाळी आबासाहेब उशकेलवार, केंद्रप्रमुख चिकना संजय कदम, केंद्रप्रमुख जारीकोट साईनाथ माळगे,केजीबीव्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चुडावकर उपस्थित होते.या प्रशिक्षण कार्यशाळेस पदोन्नत मुख्यध्यापकासह जिल्हा परिषद शाळेचे 56 इतर व्यवस्थापनाचे 30 असे एकूण 86 मुख्याध्यापक व प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या प्रशिक्षणात विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षितता अंतर्गत सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन शिष्टाचार, सेफ अँड अन सेफ टच, रस्ता आणि वाहतूक सुरक्षा, प्रथमोपचार, हात धुण्याच्या पद्धती,मानसिक आरोग्याला अग्रक्रम, राईट टू एज्युकेशन व आग संरक्षण याविषयी प्रोजेक्टर द्वारे उत्कृष्टरित्या माहिती देण्यात आली. येणाऱ्या काळात विद्यार्थी विषयक सुरक्षा व सुरक्षितता याविषयी प्रशिक्षणाचे उपयोगिता महत्त्वाची आहे असे मनोगत शिवकुमार पाटील यांनी मांडले.प्रशिक्षण सहाय्यक गट साधन केंद्र धर्माबादचे रईनदास खाटे ,धनराज चव्हाण, नागनाथ भत्ते व मनोहर बोपटे यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशिक्षणात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना प्रशिक्षण साहित्याचे वाटप करण्यात आले. इतर व्यवस्थापनाच्या शाळांना पेनड्राईव्ह द्वारे माहिती देण्यात येणार आहे.कार्यशाळा प्रमुख शिक्षण विस्ताराधिकारी बि.डी.जाधव यांनी उपस्थितांच्या आभाराने कार्यशाळेची सांगता केली.