महाराष्ट्र राज्य विज तांत्रिक कामगार संघटनेची (१७०१) स्थापना दि.११/१२/१९९७ रोजी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हाजी सय्यद जहिरोद्दीन यांनी केली.हि संघटना अराजकीय असून फक्त तांत्रिक कामगारांचे नेतृत्व करते. या संघटनेस पाहता पाहता २६ वर्षे पूर्ण होऊन २७ वर्षात पदार्पण करीत आहे. संघटनेचे २७ वे महाअधिवेशन दि. ०५ जानेवारी २०२५ रोजी कोकण मधील कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत व हजारोच्या सभासदांच्या संख्येने साजरा होणार आहे.
या वर्धापन दिनानिमित्त दि.११/१२/२४ रोजी महापारेषण कंपनी छत्रपती संभाजीनगर परिमंडळ कार्यालय हर्सूल समोरील संघटनेच्या वार्ता फलकाला खालील मान्यवरांच्या हस्ते हार, नारळ व पुजन करून २७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी नसीर कादरी – मुख्य अभियंता, मा.आर.पी चव्हाण.- अधीक्षक अभियंता, मा.एस.पी. कांबळे – अधीक्षक अभियंता ,सौ.मंजुषा दुसाने – सहाय्यक महाव्यवस्थापक मासं, योगेश देशपांडे – कार्यकारी अभियंता, महापारेषण विंगचे केंद्रीय अध्यक्ष मा.अजिज पठाण , उपसरचिटणीस संतोष वाघमारे, राज्य महिला प्रतिनिधी – सीमा मोहिते, सुधाकर दौड,सौ.छाया भदर्गे,सौ.शालू बगाटे,विजय भालेकर, तानाजी खोडके , सचिन पवार,प्रकाश पोंगळे,संजय महाले, सायलू अप्सलवार,राजेंद्र महाजन, मधुकर साबळे,किरण कन्हाके,गणेश बनकर,तसेच संघटनेचे सन्माननीय झोन, सर्कल, विभागीय पदाधिकारी व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.