धर्माबाद (प्रतिनिधी):- काल परभणी शहरांतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतीकात्मक असलेल्या प्रतिची विटंबना एका माथेफिरूने केली आहे, ही घटना लक्षात आल्यावर परभणी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, या घटनेचा धर्माबाद शहरांमध्ये तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. या घटनेचा निषेध म्हणून उद्या १२/१२/२०२४ गुरुवार रोजी धर्माबाद कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या वतीने घेण्यात आले असून, तालुक्यातील भीम आर्मी, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा ,सकल बौद्ध समाज, फुले शाहू आंबेडकर अण्णा भाऊ विचाराच्या अनुयायांचा बंद मध्ये सहभाग असणार असून समाजाच्या भावना लक्षात घेऊन व्यापारी वर्ग, प्रशासनाने सहकार्य करावे अशी भिम अनुयायींच्या विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधाना च्या प्रतीची विटंबना झाल्यामुळे धर्माबाद येथील सर्व आंबेडकरी अनुयायाने परभणी येथील घटना जाहीर निषेध करत धर्माबाद शहर उद्या बंद चे निवेदन धर्माबाद पोलीस स्टेशनला दिले आहे तसेच समस्त भिम अनुयायींच्या व्यापारी महासंघाला निवेदन देऊन उद्या बाजारपेठ बंद ठेवण्याची विनंती केले असून उद्या मोर्चा देखील काढण्यात येणार असून उद्याच्या मोर्चाचा मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक फुलेनगर येथून, बसवन्ना हिल्स, रामनगर चौक, वाल्मिकी चौक, आंध्रा बसस्थानक, नरेंद्र चौक, नेहरू चौक, पोलीस ठाणे, पानसरे चौक मेन रोड मोंढा रोड, शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय येथे दुपारी ४.०० वाजता सांगता करण्यात येईल.
भारतीय राज्यघटनेचा अवमान झाला असून सर्व भारतीय जनतेने निषेध करणे गरजेचे आहे. राज्यघटनेत देशातील सर्व जाती धर्माच्या घटकांना न्याय दिलेला आहे म्हणून देशाचे एकात्मता अबाधित आहे. जातीवादी मानसिकतेचा अज्ञानी जे नीच कृत्य केले आहे त्याच कठोर शासन झाले पाहिजे भविष्यात कोणत्याही महापुरुषांची विटंबना झाली नाही पाहिजे, महापुरुषांचे कार्य कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नसते याचे प्रबोधन होणे काळाची गरज आहे. ज्या संविधानावर भारत देश चालतो त्याच संविधानाची महाराष्ट्रात विटंबना करण्यात येते ही खूप मोठी शोकांतिका आहे झालेल्या त्या घटनेबद्दल समस्त भीमसैनिक व अनुयायाच्या भावना दुखावले आहेत.
संविधानाच्या प्रतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकास परभणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तरी त्या समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई करून फाशी शिक्षा देण्यात यावी अशी समस्त भिम अनुयायी यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे. व त्या समाजकंटकाला असे कृत करण्यासाठी कोणी सांगितले आहे, हाचा पण तपास करावा तालुक्यातील बौद्ध अनुयायी व सर्व धर्मातील संविधान प्रेमी लोकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.