NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड :- पवित्र रमजान महिन्याचे वातावरण उत्साहात सुरू असतानाच, नांदेडमधील चैतन्य नगर येथील प्रतिष्ठित हबीब उर रहमान यांच्या परिवारात एक विशेष आनंदाची घटना घडली आहे. झिया उर रहमान यांचे सुपुत्र, झेन उर रहमान आणि अफान उर रहमान या दोन भावांनी आपला पहिला रोजा अत्यंत धार्मिक श्रद्धेने आणि उत्साहाने पूर्ण केला आहे.
हे दोघेही नांदेडचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व हबीब उर रहमान यांचे नातू आहेत. लहान वयातच आपल्या धार्मिक कर्तव्याचे पालन करून, झेन आणि अफान यांनी संयम आणि शिस्तीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. या दोन भावांनी पहिल्यांदाच रोजा पूर्ण केल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
झेन आणि अफान हे साप्ताहिक युवा रक्षक चे संपादक मोहम्मद नाहिद अ.समी यांचे भाचे आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. रोजा पूर्ण करण्याची त्यांची जिद्द इतर मुलांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. हबीब उर रहमान यांच्या संपूर्ण कुटुंबावर आणि झिया उर रहमान यांच्या कुटुंबीयांवर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



