HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.
वसमत :- आंबेडकरी चळवळीचे गट नेते, खंबीर नेतृत्व, जनसंपर्काचा धनी आणि वसमत नगर परिषदेचे लोकप्रिय नगरसेवक युवराजभाऊ आवटे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला.
युवराजभाऊंच्या वाढदिवसानिमित्त वसमत येथील त्यांच्या स्नेही व कार्यकर्त्यांनी मोठा सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रामुख्याने युवा नेते लक्ष्मीकांत भैय्या नवघरे यांनी उपस्थित राहून युवराजभाऊंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच गट नेते सचिन भाऊ दगडू, बाळू मामा ढोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते, ज्यात दिलीप भोसले पाटील (नगरसेवक) , सय्यद नम्मू (नगरसेवक), म. वसीम कुरेशी (युवा उद्योजक तथा शासकीय कंत्राटदार), रवी डोळसे व सर्व मान्यवर उपस्थित होते.
केवळ मान्यवरच नव्हे, तर वसमतमधील नागरिक आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. युवराजभाऊंच्या जनसेवेचा आणि चळवळीतील त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी करण्यात आला. “भाऊंचा स्वभाव आणि सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळेच आज सर्व स्तरांतून त्यांना प्रेम मिळत आहे,” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मित्र मंडळाने आणि हितचिंतकांनी युवराजभाऊंना पुष्पहार घालून आणि केक कापून शुभेच्छा दिल्या.



