NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- आधुनिक मराठी पत्रकारितेचे जनक आणि थोर समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, धर्माबाद येथे भव्य ‘पत्रकार सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा जनहित पार्टीच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविला जाणार असून, मंगळवार ६ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांच्या महान कार्याचे स्मरण करणे आणि समाजाचा आरसा म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांच्या योगदानाची दखल घेणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाज प्रबोधनाचे मोठे कार्य करत असतात, त्यांच्या या कष्टाला प्रोत्साहन देण्यासाठी मराठवाडा जनहित पार्टीने या विशेष सोहळ्याचे नियोजन केले आहे.
•कार्यक्रमाचा तपशील:
दिनांक: ६ जानेवारी २०२६ (मंगळवार)
वेळ: सायंकाळी ठीक ७:०० वाजता
स्थळ: मराठवाडा जनहित पार्टी संपर्क कार्यालय, धर्माबाद.
या सोहळ्यामध्ये धर्माबाद तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल यथोचित सन्मान केला जाणार आहे. तरी या गौरव सोहळ्यास तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू-भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठवाडा जनहित पक्ष, धर्माबाद तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.



