NAGPUR | नागपूर | युवा रक्षक वृत्तसेवा.
नागपूर :- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत बाबा ताजोद्दीन(र.अ.) नागपूर शरीफ यांच्या दर्गामध्ये नुकतीच चादर पोशी आणि जियारत (दर्शन) करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमानिमित्त वसमतचे लोकप्रिय आमदार राजूभैया नवघरे व त्यांचे सहकाऱ्यांनी हजेरी लावली.
यावेळी आमदार नवघरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये शेख शोएब, इंजि. सय्यद इम्रान अली, गज्जू भाऊ, साकीद भाई, बेंडे पाटील अंबादास, रुतिक भाऊ, शेख मोहसीन, मिन्हाज बिल्डर, मुदसीर कुरेशी, आणि मोहसीन खान एम. के. यांचा समावेश होता.
यावेळी सर्व उपस्थितांनी हजरत बाबा ताजोद्दीन(र.अ.) यांच्या चरणी चादर अर्पण करून देशात आणि राज्यात शांतता, सौहार्द आणि समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना केली.



