-1.1 C
New York
Monday, January 19, 2026

Buy now

spot_img
spot_img

धर्माबाद नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी मोठी राजकीय घडामोड! रा. काँ.अजितदादा गट-भाजप युतीची शक्यता; चर्चांना वेग!

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद :- नजीकच्या काळात होणाऱ्या धर्माबाद नगरपरिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी ‘महायुती’चा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित दादा गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्माबाद मध्ये या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते युतीच्या शक्यतेवर गंभीरपणे विचार करत आहेत आणि त्यांच्यात जागावाटप व रणनीतीबाबत प्राथमिक चर्चा सुरू झाल्या आहेत.

• नगराध्यक्षपदावर लक्ष:

नगराध्यक्षपद जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येत आपली ताकद वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, या निवडणुकीतील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

• विरोधकांसाठी आव्हान:

या संभाव्य युतीमुळे विरोधी पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना आता या नव्या समीकरणाचा सामना करण्यासाठी आपली रणनीती बदलावी लागणार आहे.

धर्माबाद मधील राजकारणाला कलाटणी देणारी ही युती प्रत्यक्षात उतरणार का? याबद्दल अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या