-5.8 C
New York
Tuesday, January 20, 2026

Buy now

spot_img
spot_img

थोरला मठ, वसमत ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रा जाणाऱ्या भाविकांचे इंजिनियर सय्यद इमरान अली यांच्या हस्ते उत्साहात स्वागत.

HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.

वसमत :- शहरातील थोरला मठ ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रेला जाणाऱ्या हजारो भाविकांचे ‘महा ऊर्जा’ चे अध्यक्ष आणि ‘राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान’ चे सदस्य, इंजिनियर तथा  समाजसेवक सय्यद इमरान अली यांनी उत्साहात स्वागत केले. या भाविकांचे स्वागत करून सय्यद इमरान अली यांनी समाजात बंधुता आणि सलोख्याचा आदर्श पुन्हा एकदा उभा केला.

वसमत ते श्री क्षेत्र कपिलधार पदयात्रेसाठी निघालेल्या भाविकांचे  इंजिनियर सय्यद इमरान अली यांनी स्वतः उपस्थित राहून, प्रत्येक भाविकांशी संवाद साधत त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व समाजाला घेऊन चालणारे समाजसेवक इंजिनियर सय्यद इमरान अली हे वसमतमध्ये एक चांगले आणि सर्वसमावेशक समाजसेवक म्हणून ओळखले जातात.

इंजिनीयर सय्यद इमरान अली हे ‘महा ऊर्जा’ चे अध्यक्ष आणि ‘राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान’ चे सदस्य म्हणून सक्रियपणे सामाजिक कार्य करतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणत्याही एका समाजासाठी नव्हे, तर सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालतात.

सर्वधर्मीय उत्सव आणि सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. यावेळी बोलताना सय्यद इमरान अली यांनी सांगितले,  भाविकांची सेवा करणे, हेच आपले सामाजिक कर्तव्य आहे. वसमतची ही सलोख्याची आणि प्रेमाची परंपरा अशीच कायम राहील, हीच अपेक्षा आहे.” सय्यद इमरान अली यांच्या या भूमिकेचे उपस्थित भाविकांनी आणि परिसरातील नागरिकांनी तोंडभरून कौतुक केले.

या स्वागतामुळे  समाजात धार्मिक सलोख्याचा संदेशही पोहोचला. तसेच थोरला मठ संस्थान कडून इंजिनियर सय्यद इमरान अली यांना पुष्पहार देऊन  सत्कार पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते व मित्र आदी उपस्थित होते.

 

Related Articles

ताज्या बातम्या