-6.7 C
New York
Wednesday, January 21, 2026

Buy now

spot_img
spot_img

नांदेड ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी: आय.जी. शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते पो.नि चिंचोलकर व टीमचा गौरव

MPDA अंतर्गत गुन्हेगारांना तुरुंगवारी; समन्स बजावण्यात राज्यात अव्वल

NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.

नांदेड :- नांदेड जिल्ह्याच्या पोलीस दलात उत्कृष्ट आणि परिणामकारक कामगिरी केल्याबद्दल नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (पो.नि) ओमकांत चिंचोलकर आणि त्यांच्या टीमला महानिरीक्षक (आय.जी.) शहाजी उमाप व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते नुकतेच दोन विशेष प्रशस्तीपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील ३६ पोलीस स्टेशनपैकी नांदेड ग्रामीणने मागील सप्टेंबर महिन्यात केलेल्या प्रभावी कार्यामुळे हा गौरव प्राप्त झाला आहे.

गुन्हेगारांना जरब, गुन्हेगारीला लगाम:

पो.नि चिंचोलकर यांच्या नेतृत्वाखालील टीमने गुन्हेगारांविरुद्ध मोठे धाडस दाखवले आहे. अनेक गंभीर गुन्हेगारांना MPDA (महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम) अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले आहे. यासोबतच, अनेक सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कठोर कारवाई केली आहे.

या उत्कृष्ट प्रतिबंधक कामगिरीबद्दल पो.नि चिंचोलकर यांच्यासह पी.एस.आय कुसमे आणि पोलीस अंमलदार तेजबंद यांना आय.जी. शहाजी उमाप यांनी खास प्रशस्तीपत्र देऊन गौरविले. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेते आणि इतर गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा वचक बसला आहे.

समन्स बजावणीत ९२% पेक्षा जास्त यश:

दुसऱ्या महत्त्वपूर्ण कामगिरीत, ग्रामीण पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रियेला गती देत समन्स बजावण्यात आणि साक्षीदारांना हजर करण्यात कौतुकास्पद यश मिळवले. त्यांनी ९२% पेक्षा जास्त समन्स बजावणी यशस्वीरित्या पूर्ण केली, तसेच जास्तीत जास्त साक्षीदारांना कोर्टात वेळेवर हजर केले.

या उल्लेखनीय कामासाठी पो.नि चिंचोलकर यांच्यासह पो.ह. मुंडे, पो.ह. जगताप आणि पो.ह. जाधव यांचाही प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांकडून चार वेळा कौतुक:

या वर्षात ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे पोलीस अधीक्षक अबिनाश  कुमार यांनीही विविध हेडखालील कामांसाठी त्यांना यापूर्वी चार वेळा प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केलेले आहे.

पो.नि चिंचोलकर यांच्या कार्यकाळात नांदेड ग्रामीण हद्दीतील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून, गुन्हेगारांवर परिणामकारक वचक बसल्याने गुन्हेगारीच्या घटनांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण पोलीस स्टेशनचा लौकिक वाढला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या