NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.
धर्माबाद :- धर्माबाद शहरातील ‘जनता इंडस्ट्रीज’चे मालक आणि प्रसिद्ध मिरची उद्योजक शेख अमिरोद्दीन यांना त्यांच्या व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नुकतीच डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
पाँडिचेरी येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीने हा महत्त्वपूर्ण सन्मान देऊन शेख अमिरोद्दीन यांच्या कार्याचा गौरव केला.
या गौरवशाली यशानंतर, धर्माबाद येथे आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात, नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते शिरीषभाऊ गोरठेकर यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शिरीषभाऊ गोरठेकर यांनी यावेळी शेख अमिरोद्दीन यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
धर्माबादच्या मातीतील एका उद्योजकाला मिळालेल्या या सन्मानामुळे संपूर्ण शहरातून व परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



