NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- सोशल मीडियाचा वापर करताना कायदेशीर आणि नैतिक जबाबदारीचे भान ठेवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार यांनी केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना चुकीच्या किंवा नकारात्मक माहितीमुळे समाजात गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे, सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे.
सोशल मीडिया वर सकारात्मक माहिती शेअर करणे, चुकीची माहिती पसरवणे टाळणे आणि इतरांचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता, समाजोपयोगी माहिती आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करावा.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर करताना चुकीच्या किंवा नकारात्मक माहितीमुळे समाजात गैरसमज पसरू शकतात. त्यामुळे, सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. माहिती आणि तंत्रज्ञान कायदा यांसारख्या कायद्यांचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले आहे.
पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना जबाबदारीने वागण्याचे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे आवाहन केले आहे.