NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- शहरातील देगलूर नाका येथील मुख्य रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यामुळे खराब झाला होता. यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येची दखल घेत माजी महापौर तथा महानगराध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नांदेड अब्दुल सत्तार अब्दुल गफूर यांच्या आदेशानुसार, स्थानिक माजी नगरसेवकांनी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली आहे.
माजी उपमहापौर अब्दुल गफ्फार, माजी नगरसेवक सय्यद शेर अली भाई, फसी भाई, हबीब बागवान, आणि अजीज कुरेशी यांनी एकत्र येत पुढाकार घेतला. त्यांनी रस्त्याच्या खराब झालेल्या भागावर चुरी (बारीक गिट्टी) टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त केला, ज्यामुळे वाहतुकीची अडचण दूर झाली आहे.
नांदेड महानगरपालिकेतील माजी नगरसेवकांनी नागरिकांच्या हितासाठी स्वखर्चाने केलेल्या या कामाबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.