HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.
वसमत:- आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १, जुम्मापेठमधून पठाण असलम बाबा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. पठाण असलम बाबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वसमत युवा शहर उपाध्यक्ष आहेत आणि वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचे कट्टर समर्थक आहेत. ते एक प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी मागील अनेक वर्षांपासून जुम्मापेठ भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच, त्यांनी अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गोरगरीब आणि गरजू लोकांना मदत केली आहे. अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच, त्यांनी अनेक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्या या कार्यामुळे ते लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.पपठाणअसलम बाबा यांच्यामूळे या प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे.