12.5 C
New York
Friday, October 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

धर्माबाद शासकीय रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर गणेश मेडिकल हॉल चे संचालक श्री. राम पाटील बाळापूरकर यांची निवड…..

NANDED | धर्माबाद | युवा रक्षक वृत्तसेवा.

धर्माबाद  दि १० सप्टेंबर २०२५ :- धर्माबाद येथील शासकीय रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीवर गणेश मेडिकल हॉलचे संचालक श्री.राम पाटील बाळापूरकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या निवडीमुळे रुग्णालयाच्या सुविधांमध्ये आणखी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या श्री.राम पाटील बाळापूरकर यांचा या निवडीमुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनात आणि रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या निवडीनंतर श्री राम पाटील बाळापूरकर यांनी सांगितले की “माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. रुग्णालयातील सोयी सुविधा वाढवणे, प्रशासनासोबत समन्वय साधून रुग्णाचे प्रश्न सोडवणे याला माझे प्राधान्य असेल.”

त्यांच्या या निवडीबद्दल आमदार , तहसीलदार यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. धर्माबाद शहरातील सामाजिक आणि वैद्यकीय वर्तुळात या निवडीचे स्वागत होत आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या