HINGOLI | वसमत | युवा रक्षक वृत्तसेवा.
वसमत:- वसमत नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष शहर अभियंता नागनाथ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. उद्योजक तथा शासकीय कंत्राटदार वसीम कुरेशी, चंद्रकांत फेगडे, आकाश कदम आणि नदीम सौदागर यांनी खास सदिच्छा भेट घेऊन देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी, उपस्थितांनी देशमुख यांच्या कार्यक्षमतेचे आणि शहराच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाचे कौतुक केले. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रशंसा करत, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.