NANDED | नांदेड | युवा रक्षक वृत्तसेवा.
नांदेड:- नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या उत्कृष्ट कार्यप्रणालीमुळे जनतेकडून त्यांचे कौतुक होत आहे. जिल्ह्यातील पूर परिस्थिती च्या काळात त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यात यश आले आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्या, ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रशंसा केली जात आहे.
त्याचप्रमाणे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पूर परिस्थिती च्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला. त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या होत्या, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळे नांदेड जिल्ह्याची सुरक्षा आणि प्रशासकीय व्यवस्था चांगली राहिल्याचे दिसून येत आहे.